गावाची माहिती:-
महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला नाशिक जिल्हातील कळवण तालुक्याच्या ठिकाणापासून पश्चिमेच्या दिशेला सुमारे २४ कि.मी. अंतरावर दुर्गम भागात वसलेले माझे गाव सप्तश्रृंगीगडाच्या देविच्या पायथ्याशी (नांदुरी) पासुन अवघ्या १८ कि.मी अंतरावर असलेल्या पेसा मध्ये समावेश असलेले आदिवासी असा शिक्का बसलेला माझा सुंदर गाव म्हणजे चणकापुर धरणाच्या नैऋत्य दिशेला व काठावर असलेला गावात अंबिका देविच्या मंदिर असलेले अंबिका ओझर हे गाव आहे. अभोणा हे गांव जवळची बाजारपेठ असून अंतर सुमारे ६ कि. मी. अंतर आहे. या गावाची लोकसंख्या साधारपणे ११९६ इतकी आहे. या गावातील लोकांच्या मुख्य व्यवसाय शेती व शेत मजुरी आहे. या गावातील लोकांच्या मुख्यता: शेतीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. तसेच ओझर व अंबिका ओझर गावातील सुधारणा साधारपणे परिस्थिती चांगली आहे. पावसाळ्यात मुख्यता: भात, नागली, बाजरी, भुईमूग, सोयाबीन ईत्यादी पिके घेतली जातात. तसेच इतर भाजीपाला ही केला जातो. बाराही महिणे पिके घेतले जातात.
ओझर या गावात जि. प. शाळा इयत्ता १ ली ते ७ पर्यंत आहे. तसेच अंबिका ओझर येथे जि.प. शाळा इयत्ता १ ली ते ४ पर्यंत आहे. तसेच या गावात ओझर व अंबिका ओझर या ठिकाणी दोन अंगणवाडी केंद्र आहेत.

















